जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२५ । जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील चिशोटी गावात गुरुवारी आकाशातून हाहाकार माजला तेव्हा शोकात रूपांतर झाले. ढगफुटीच्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. मचैल माता मंदिरा यात्रा मार्गावर ही आपत्ती कोसळली असून या घटनेत आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात दोन सीआयएसएफ जवानांचा समावेश आहे. त्याचवेळी 70 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असून 100 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. 37 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना किश्तवाडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलय. घटनेच्या ठिकाणी डझनभर घरे, दुकाने आणि पूल वाहून गेले आहेत

काय आहे घटना?
चशोती गाव किश्तवाड शहरपासून जवळपास 90 किलोमीटर दूर आहे. 9500 फूट उंचावरील मचैल माता मंदिरात जाण्यासाठी यात्रेकरुन चशोती गावापर्यंत वाहनाने येऊ शकतात. त्यानंतर त्यांना 8.5 किलोमीटरचा रस्ता पायी चालावा लागतो. तिथे गुरुवारी अचानक ढगफुटी झाली. त्यांनतर अचानक पूर आला आणि मोठ्या प्रमाणात विद्ध्वंस घडला.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 38 लोकांच्या मृत्यूची पुष्टि झाली आहे. मृतकांची संख्या वाढण्याची भिती आहे. आतापर्यंत 100 लोकांना वाचवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जवळपास 200 लोक अजूनही बेपत्ता आहेत.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांसह लष्करी जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून अनेक गावे या पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला स्वतः रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत.











