जळगावसह भुसावळच्या प्रवाशांना दिलासा ! होळीनिमित्त 44 विशेष गाड्या धावणार
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२४ । होळीनिमित्त रेल्वे प्रवासातील गर्दी कमी व्हावी यासाठी मध्य रेल्वेने ११२ होळी विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. यातील ४४ रेल्वे भुसावळमार्गे धावतील. यामुळे जळगावसह भुसावळच्या प्रवाशांना दिलासा मिळाला.
०१०५३ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-वाराणसी साप्ताहिक विशेष रेल्वेच्या सहा फेऱ्या होणार आहेत. ही गाडी १३ , २० आणि २७ मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि वाराणसीला दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता . तर पोहोचेल. या गाडीच्या तीन फेऱ्या होतील ०१०५४ क्रमांकाची गाडी १४, २१ आणि मार्चला वाराणसीहून २०.३० वाजता २८ सुटेल, मुंबईला दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या तीन फेऱ्या ०१०४३ लोकमान्य टिळक टर्मिनस होतील. मुंबई- समस्तीपुर साप्ताहिकच्या चार फेऱ्या होणार आहे.
ही रेल्वे २१, २८ मार्च रोजी मुंबईहून १२.१५ वाजता सुटेल आणि समस्तीपूरला दुसऱ्या दिवशी २१.१५ वाजता पोहोचेल. ०१०४४ क्रमांकांची गाडी २२ आणि २९ मार्च रोजी समस्तीपूर येथून २३.२० ला सुटेल. मुंबईला दुसऱ्या दिवशी ७.४० वाजता पोहचेल. मुंबई-प्रयागराज (०१०४५) ही १२, १९, २६ मार्च आणि २ एप्रिल रोजी धावेल तर प्रयागराज-मुंबई (०१०४६) ही गाडी १३, २०, २७ मार्च आणि ३ एप्रिल रोजी धावेल. मुंबई-दानापूर (०१४०९) २३, २५ आणि ३० मार्च रोजी धावेल. तर दानापूर-मुंबई (०१४१०) २४, १६ आणि ३१ मार्चला धावणार आहे. या गाडीच्या तीन फेऱ्या होणार आहेत. पुणे-दानापूर (०११०५) १७, २४ मार्च रोजी तर दानापूर-पुणे (०११०६) १८ आणि २५ मार्च रोजी, पुणे-कानपूर (०१०३७) २०, २७ मार्च रोजी धावणार असे रेल्वे विभागाने सांगितले