बातम्या

कोरोनाचा आज पुन्हा उच्चांकी आकडा, तीन तालुक्यात शून्य तर जळगाव शहरात सर्वाधिक रुग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली होती. मात्र, मंगळवारी नव्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ झाली होती. दरम्यान, बुधवारी दिवसभरात तब्बल ४६९ कोरोना रुग्ण आढळून आले आहे.

corona update

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार २५४ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ८०६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५८० बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता २ हजार ८६८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत असून नागरीकांनी आपल्या सह आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात दिवसभरात ४६९ रूग्ण आढळून आले आहे. तर ७९ रूग्ण उपचार घेवून घरी परतले आहे. यात जळगाव शहर-१२६, जळगाव ग्रामीण-२२, भुसावळ-११८, अमळनेर-३७, चोपडा-५५, पाचोरा-१३, भडगाव-०, धरणगाव-५, यावल-६, एरंडोल-४०, जामनेर-८, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-३३, मुक्ताईनगर-४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ४६९ बाधित रूग्ण आढळले आहे.

हे देखील वाचा :

    चेतन वाणी

    पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

    Related Articles

    Back to top button