कासारखेडा येथील 33 वर्षीय विवाहिता बेपत्ता; पोलिसात हरवल्याची नोंद
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील कासारखेडा येथील 33 वर्षीय विवाहिता गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. सोनी अमित पाटील (33, रा.कासारखेडा, ता.यावल) असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.
सोनी पाटील या पती व तीन मुलांसह वास्तव्यास असून पती अमित हे नोकरीनिमित्त दुबई येथे गेल्याने सोनी पाटील या माहेरी आई प्रमिलाबाई तोताराम पारधे यांच्यासह वास्तव्याला आहे. 28 मार्च रोजी सोनी पाटील या मुलांसाठी कपडे घेण्यासाठी जळगाव येथे जात असल्याचे सांगून निघाल्या होत्या. मात्र, रात्री उशीरापर्यंत त्या घरी न असल्याने त्यांची आई प्रमिलाबाई आणि इतर नातेवाईकांना तिचा शोध घेण्यास सुरूवात केली परंतु विवाहिता ह्या कोठेही मिळून न आल्याने विवाहितेची आई प्रमिलाबाई यांनी 5 एप्रिल रोजी यावल पोलिसात तक्रार दिल्यानंतर हरवल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजीज हमीद शेख करीत आहे.