सीसीटीव्ही लांबविणाऱ्या दोघांना सुनावली कोठडी

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२२ । सीसीटीव्ही कॅमेरा, एलईडी टीव्ही आणि या कॅमेराचा डिव्हीआर चोरी झाल्याचा प्रकार यावल तालुक्यातील मालोद ग्रामपंचायतीमध्ये उघडीस आला होता. या प्रकरणी यावल पोलिसांनी गावातील दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्या कडून एक सीसीटीव्ही कॅमेरा जप्त करण्यात आला आहे.

crime 2022 06 04T110549.463 jpg webp

मालोद ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत चौक आणि परिसरातील हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिव्हीआर आणि एलईडी टीव्ही ग्रामपंचायत कार्यालयात होता. २८ मे रोजी सकाळी हे साहित्य लांबवल्याचे उघडकीस आले होते. यावल पोलिसांनी समीर गुलशेर तडवी (वय २१, रा. हतनूर कॉलनी चोपडा, ह.मु. मालोद) व कुदबुद्दीन रशीद तडवी (वय २०, रा. मालोद) यांना अटक केली, दोघांना पोलीस कोठडी सुनावली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now