⁠ 
शनिवार, जून 15, 2024

Yawal : वाळू माफियांचा हैदोस, मंडळाधिकाऱ्याला मारहाण करत काट्याच्या झुडूपात ढकललं

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२३ । जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. वाळू माफियांवरील पोलिस आणि महसूल प्रशासनाचा वचक कमी झाल्याने वाळूचोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. अशातच बेकायदेशीररित्या वाळूची चोरटी वाहतूक करतांना कारवाईसाठी आलेल्या मंडळाधिकाऱ्याला दोन ट्रॅक्टर चालकांनी चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गटारीसह काट्याच्या झुडूपात ढकलून दिले. याबाबत यावल पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मालकासह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
यावल तालुक्यातील साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप हे तलाठी मधुराज पाटील, कोतवाल विकास सोळंके हे अवैध वाळू वाहतुक प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गस्तीपथकावर होते. यावल तालुक्यातील डांभुर्णी येथून कोळन्हावी येथील तापी नदीपात्रात जाणाऱ्या नाल्यात निळ्या रंगाचे ट्रॅक्टर दिसल्याने पथकाने त्यास थांबवून तपासणी केली असता ट्रॅक्टर मध्ये वाळू दिसून आले. पथकाने परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वाहतुकीचा परवाना नव्हता, ट्रॅक्टर चालकाने कोळन्हावी येथील सुपडू रमेश सोळुंके यांचे ट्रॅक्टर असल्याचे सांगितले.

ट्रॅक्टर चालकांनी हायड्रोलिकद्वारे वाळू खाली करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असता पथकाने तात्काळ शासकीय वाहनास बोलावून घेतले. त्यानंतर जप्त केलेल ट्रॅक्टर कार्यवाहीसाठी यावलकडे आणत असताना, ट्रॅक्टर चालकाने नावरे फाट्या जवळून शिरसाड गावाकडे पळ काढला. त्याचा पाठलाग करून साकळी येथील मुस्लिम कब्रस्तान जवळ ट्रॅक्टर पकडला.

त्यावेळी ट्रॅक्टर मालक सुपडू रमेश सोळुंके, चालक आकाश अशोक कोळी, गोपाळ प्रल्हाद सोळुंके यांनी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना “मी तुला जिवंत ठेवणार नाही” यासह लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जगताप यांना गटारीत व काट्यात फेकून दिले. मंडळाधिकारी सचिन जगताप यांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला असता त्यांचे दिशेने दगडफेक करण्यात आले. ट्रॅक्टर मालकांसह दोन चालकांनी शासकीय कामात अडथळा, मंडळ अधिकारी जगताप यांना मारहाण करून दुखापत केल्याचे कारणावरून येथील पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आ. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.