ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून एकाला ३२ हजारचा चुना; गुन्हा दाखल 

ऑक्टोबर 31, 2021 4:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२१ । दादावाडी येथे वास्तव्यास असलेल्या मुकेश बाळकृष्ण गुरव (वय-४१) यांना  अनोळखीनंबरवरून आलेल्या ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून क्रेडीट कार्ड नंबरचा वापर करून ३२ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी उघडीला आला. याप्रकरणी मुकेश बाळकृष्ण गुरव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Untitled design 20 jpg webp
सविस्तर माहिती अशी की, मुकेश बाळकृष्ण गुरव (वय-४१) रा. गुजराल पेट्रोल पंपजवळ, दादावाडी हे आपल्या कुटुंबियासह राहतात. ते खासगी वाहनाचे चालकाचे काम करून उदरनिर्वाह करतात. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेशेजारी कामाच्या निमित्ताने आले होते. त्यांनी एका अनोळखी नंबरवरून मोबाईलवर फोन आला. आपण एसबीआय क्रेडीट कार्ड वरून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना ३२ हजार ७८६ रूपये कट होण्यासंदर्भात मॅसेज आला. त्यांनी ॲपच्या माध्यमातून आणि स्टेटमेंटच्या माध्यमातून चौकशी केली असता ३२ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समोर आले.
दरम्यान ,त्यांनी तातडीन जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुकेश बाळकृष्ण गुरव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रामभाऊ बडगुजर करीत आहे

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now