भुसावळातील ३२ उपद्रवी गुन्हेगार गणेशोत्सवात हद्दपार

सप्टेंबर 8, 2021 5:32 PM

जळगाव लाईव्ह न्युज | ८ सप्टेंबर २०२१ |णेशोत्सवास 10 सप्टेंबरपासून सुरूवात होत असून उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व तालुक्यातील ३२ उपद्रवी गुन्हेगारांना ९ ते २१ सप्टेंबर या काळात शहरासह तालुक्यातून हद्दपार करण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी काढले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासन आता नव्याने २१ जणांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध गणेश मंडळात शांतता राहण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी शहर व तालुक्यातील पोलीस ठाणे हद्दीतील उपद्रवींविरोधात कारर्वासाठी प्रांताधिकारी यांच्याकडे शहरबंदीचे 35 प्रस्ताव सादर केले होते. मंगळवारी एकूण 32 जणांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे उपअधीक्षक वाघचौरे यांनी सांगितले.

हद्दपारीत या 32 जणांचा समावेश?

उस्मान हसन गवळी, अनिल राजारा पारधी, संतोष गोपाळ मोरे, कीशोर मनोहर चौधरी, मुकूंदा संतोष लोहार, रवींद्र दिनेश मोरे, खलील हसन गवळी, विक्की देवपुजे, अक्षय रतन सोनवणे, भूषण उर्फ टक्या मोरे, सूरज आनंदा चंडाले. राकेश राजू बार्‍हे, धीरज चंडाले, प्रमोद प्रकाश धांडे, आकाश देवरे, रत्नपाल नरवाडे, जितेंद्र शरद भालेराव, लक्ष्मण दलपत मोरे, गौरव सुनील नाले, सुभान तुकडू गवळी यांच्यासह 32 जणांचा समावेश आहे.

प्रांताधिकारी यांनी मंगळवारी काढलेल्या आदेशाची शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे व तालुका पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून अंमलबजावणीला सुरूवात करण्यात आली आहे. तिन्ही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नोटिसा बजाविण्यासाठी नियोजन केले असल्याचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे व तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now