जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२५ । भारतीय लष्कर (Indian Army) आज ७७ वा सेना दिन (Sena Day) साजरा करत असून यातच आजचा दिवस हा देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. कारण भारतीय नौदल ताफ्यात आयएनएस सुरत (INS Surat) , आयएनएस नीलगिरी (INS Nilgiri) आणि आयएनएस वागशीर (INS Vagashir) या तीन शक्तीशाली युद्धनौकांचा समावेश होणार असल्याने भारताची ताकद आणखी वाढणार आहे.
आयएनएस सूरत: खासियत काय?
या युद्धनौकेची लांबी १६४ मीटर असून ती 7400 टन विस्थापनासह येते.
स्टलेथ फिचर्स आणि अत्याधुनिक रडारने सुसज्ज
जमिनीवर आणि हवेत मारा करण्याची क्षमता
मिसाइल्स, टॉरपीडो आणि अन्य शस्त्रांनी सुसज्ज
आयएनएस नीलगिरी: खासियत काय?
आयएनएस नीलगिरी ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17ए अंतर्गत बनवण्यात आलेली पहिली स्टेल्थ फ्रिगेट आहे.
ही युद्धनौका १४९ मीटर लांब आणि जहाजाचे विस्थापन 6670 टन आहे.
नीलगिरीला ब्लू वॉटर ऑपरेशनसाठी डिझाइन करण्यात आले आहे.
जमिनीवर आणि हवेत मारा करण्याची क्षमता.
इंटीग्रेटेड प्लेटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टमने सुसज्ज.
आयएनएस वाघशीर: खासियत काय?
भारतीय नौदलाच्या स्कॉर्पीन-क्लास प्रोजेक्ट 75 अंतर्गत निर्मिती करण्यात आलेली सहावी आणि शेवटची डीजेल-इलेक्ट्रिक सबमरीन आहे.
शत्रुच्या प्रदेशात गुप्तपणे काम करण्यासाठी ही पाणबुडी डिझाइन करण्यात आली.
वाघशीर ६७ मीटर लांब आणि १ हजार ५५० किलो वजनाची आहे.
वाघशीरमध्ये एंटी-शिप मिसाइल आणि अत्याधुनिक सोनार सिस्टम आहे.
समुद्राच्यावर आणि माण्याच्या खाली मारा करण्याची क्षमता.