---Advertisement---
चाळीसगाव

बापरे: चाळीसगाव तालुक्यात दीड वर्षात 29 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२३ । दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत असून अशातच विदारक चित्र जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पाहण्यास मिळत आहे. गेल्या १५ महिन्यात २९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सर्वाधिक घटनांमध्ये कर्जबाजारीपण हे महत्त्वाचे कारण आहे. पंधरा महिन्यात २९ याचा अर्थ प्रत्येक पंधरा दिवसाला एक आत्महत्या झाल्याची दिसून येते.

farmer 1 jpg webp

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली. मात्र पावसाचा खूप मोठा खंड पडल्याने पेरणी करून हाती काहीही आले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. यामुळे घरातील खर्च कसा भागवायचा, या विवंचनेने शेतकरी दिसून येत आहेत. यातूनच टोकाचे पाऊल उचलल्याचे कारणे समोर आली आहेत. गेल्या पंधरा महिन्यात तब्बल २९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून मदतीसाठी १५ पात्र ठरले. तर पाच अपात्र असून यातील पाच तालुकास्तरावर प्रलंबित आहेत.

---Advertisement---

एकाच गावात ५ शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल
सर्वाधिक घटनांमध्ये कर्जबाजारीपण हे महत्त्वाचे कारण आहे. पंधरा महिन्यात २९ याचा अर्थ प्रत्येक पंधरा दिवसाला एक आत्महत्या झाल्याची दिसून येते. चिंचगव्हाण येथे सर्वाधिक पाच आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे शासन दरबारी मदतीसाठी पात्र ठरली असून, संबंधित कुटुंबांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे. त्यातील काहींना मदत मिळाली आहे तर पाच अपात्र झाली असून, काही प्रकरणे आजही प्रलंबित आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---