विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सवलतीच्या व्याज दराने अर्थ सहाय्य देऊन त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नती करणे.

योजनेच्या प्रमुख अटी :

● अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
● अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातीलच असावा.
● अर्जदाराचे वय 18 ते 45 पर्यंत असावे.
● अर्जदाराकडे कोणत्याही शासकीय, निमशासकीय अथवा वित्तीय संस्थेचे कर्ज बाकी असू नये.
● राज्य महामंडळाच्या योजनांकरीता शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 1,00,000/- व केंद्रीय महामंडळाच्या योजनांकरीता
शहरी भागाकरीता रु. 1,20,000/- व ग्रामीण भागाकरीता रु. 98,000/- पर्यंत असावे.
● या योजनेअंतर्गत एकाच शासकीय उपक्रमांकडून लाभधारकाला कर्ज / अनुदान घेता येणार नाही.
● महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी अर्जदारास बंधनकारक राहतील.
● कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला एकदाच कर्ज मिळेल.
लाभाचे स्वरुप :
● 25 टक्के बीजभांडवल योजना
- प्रकल्प मर्यादा रु. 5,00,000/-
- परतफेड कालावधी 5 वर्षे
● 25,000/- थेट कर्ज योजना
- प्रकल्प मर्यादा रु. 25,000/-
- परतफेड कालावधी 4 वर्षे
आवश्यक कागदपत्रे :
● महाराष्ट्र राज्यातील सक्षम अधिका-याने दिलेला जातीचा व उत्पन्नाचा दाखला.
● योजनेसंबंधीची सविस्तर माहिती दरपत्रक, कच्चा माल कसा तयार होणार, तयार माल कसा विकणार इत्यादी तपशिल (प्रकल्प अहवाल)
● अर्जदाराने काही तांत्रिक प्रशिक्षण घेतले असल्यास, प्रमाणपत्राची प्रत.
● अर्जदार ज्या जागेत व्यवसाय करणार आहे त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा.
● अर्जदारास व्यवसायाचा पुर्वानुभव असल्यास त्याबद्दल पुरावा.
● शिधा वाटप पत्र (रेशनिंग कार्ड) आधार कार्ड, पॅन कार्ड ची प्रत बंधनकारक आहे.
● ऑटोरिक्षा करीता अर्ज करावयाचा असल्यास वाहन परवाना, प्रादेशिक परिवहन विभागाकडील (आर.टी.ओ.) परवाना.
● ऑटोरिक्षा करीता नंबर लावल्याचा पुरावा व रिक्षा बुकिंगबद्दल विक्रेत्याकडील दरपत्रक.
● दोन पात्र शासकीय जामिनदारांची पात्रता सिध्द करणारी कागदपत्रे, उदा. जमिनीचा सात बारा उतारा (ग्रामीण भागाकरीता), वेतन पत्रक, कार्यालयीन ओळखपत्र.
महत्वाचे : कर्ज अर्ज सादर करतांना दस्तऐवजांची सत्यप्रत पडताळणीकरीता सोबत ठेवावेत.
संपर्क कार्यालयाचे नाव : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा
( टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)












