⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जीएस ग्राउंडवरील गर्दीप्रकरणी २० हजाराचा दंड

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । जळगाव शहरातील जी.एस. ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या अम्युझमेंट पार्कमध्ये झालेल्या गर्दी प्रकरणी महापालिका प्रशासनाकडून आयोजकांना २० हजाराचा दंड करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी लस घेतली आहे नाही, याची खात्री करण्याच्या सूचना देखील मनपा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

जळगाव शहरातील जीएस ग्राउंडवर अम्युझमेंट पार्कचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गर्दी होत असल्याने व अनेक नागरिक विनामास्क फिरत असल्याचे आढळून आले होते तसेच अम्युझमेंट पार्कच्या आयोजकांकडून या ठिकाणी सॅनेटायझरची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे महानगरपालिकेचे उपायुक्त शाम गोसावी यांनी आयोजक नागेश पुंडलिक पाटील (रा. जामनेर) यांना नोटीस बजावून २० हजार रुपयांचा दंड केला होता.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर अम्युझमेंट पार्क आयोजकांकडून २० हजाराचा दंड बुधवार दि.१ रोजी भरण्यात आला. यावेळी अम्युझमेंट पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांची प्रवेशद्वारावरच लस घेतली आहे की नाही याची खात्री करण्यात यावी, तसेच येणाऱ्या प्रत्येकाला २ मास्क देण्यात यावे, अशा सूचना मनपा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.