जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । मार्च महिना संपत आला असून यांनतर एप्रिल महिना म्हणजेच नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. या खरं तर, दर महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलतात. पण नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक नियम बदलणार आहेत. या बदलांचा परिणाम सामान्य लोकांच्या खिशावर आणि आर्थिक योजनांवर होऊ शकतो.

एलपीजी आणि CNG दरांमध्ये संभाव्य बदल
तेल आणि वायू वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत सुधारणा करतात. त्यामुळे १ एप्रिल रोजी नवीन दर लागू होऊ शकतात. सध्या, बराच काळ LPG गॅसच्या किंमती स्थिर आहेत, त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात किंमतीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तसेच, CNG गॅसच्या दरांमध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे.
UPI व्यवहारांमध्ये नवीन नियम
सध्या UPI पेमेंट सिस्टम खूप लोकप्रिय आहे, मात्र १ एप्रिल २०२५ पासून निष्क्रिय UPI खाती बंद करण्यात येणार आहेत. ज्या मोबाईल नंबरवर UPI खाते लिंक केले आहे पण ते सक्रिय नाहीत, ते बँक रेकॉर्डमधून काढून टाकले जातील. त्यामुळे जर तुमचा मोबाईल नंबर UPI शी जोडलेला असेल, पण तुम्ही तो वापरत नसाल, तर १ एप्रिलपासून तो बंद केला जाईल.
बँक खात्यांमध्ये महत्त्वाचे बदल
SBI, PNB आणि इतर काही बँकांनी किमान बँक बॅलन्सच्या मर्यादेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार, प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळी किमान शिल्लक मर्यादा असणार आहे आणि त्यानुसार शुल्क आकारले जाईल. जर खात्यात आवश्यक किमान रक्कम नसेल, तर दंड आकारला जाईल. सध्या प्रत्येक बँकेसाठी ही मर्यादा वेगवेगळी आहे, मात्र भविष्यात या नियमांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे.
परदेशात पैसे पाठवण्यासाठी कर नियम
आरबीआयच्या उदारीकृत रेमिटन्स योजनेअंतर्गत, जर तुम्ही १ एप्रिल २०२५ पासून परदेशात शिकणाऱ्या मुलांसाठी फी किंवा इतर खर्चासाठी १० लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवले तर तुम्हाला कोणताही टीडीएस भरावा लागणार नाही. सध्या वैद्यकीय उपचार आणि शिक्षणासाठी ७ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवण्यासाठी ५% टीडीएस भरावा लागत होता.
एटीएममधून पैसे काढण्याचे नियम
अनेक बँका १ एप्रिलपासून त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या धोरणात बदल करणार आहेत. इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कमी करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार, ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून फक्त ३ वेळा मोफत पैसे काढता येतील. तर १ मे पासून आर्थिक व्यवहारांसाठी अतिरिक्त २ रुपये आकारले जातील. मोफत मर्यादेनंतर रोख पैसे काढण्यासाठीही १७ रुपयांऐवजी १९ रुपये आकारले जातील.
एफडीशी संबंधित नियम
ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने एफडीवरील व्याजावर मोठी सवलत दिली आहे. १ एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस सूट मर्यादा वाढवण्यात येणार आहे. आतापर्यंत सूट मर्यादा ५०,००० रुपये होती. पण त्यात २ पट वाढ करण्यात आली आहे म्हणजेच १ लाख रुपये. म्हणजेच आता ज्येष्ठ नागरिकांना एफडी किंवा आरडीमधून मिळणाऱ्या १,००,००० रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावर कोणताही टीडीएस लागणार नाही.
क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल
पुढील आर्थिक वर्षात काही क्रेडिट कार्ड नियम बदलले जात आहेत, ज्याचा परिणाम कार्डधारकांच्या रिवॉर्ड सिस्टमवर होईल. SBI SimplyClick क्रेडिट कार्डाने Swiggy रिवॉर्ड पॉइंट्स १० पटवरून ५ पट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, Air India ने सिग्नेचर पॉइंट्स ३० वरून १० पर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता पूर्वीइतके फायदे मिळणार नाहीत.