जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । शहरातील हरिविठ्ठल नगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द रामानंदनगर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अल्पवयीन मुलगी ही हरिविठ्ठल नगरात कुटुंबासह वास्तव्यास आहे. जेवण झाल्यानंतर मंगळवारी रात्री ११ वाजता कुटुंबीय झोपून गेले होते. बुधवारी पहाटे अल्पवयीन मुलीच्या वडिलांना जाग आल्यानंतर त्यांना मुलगी झोपलेल्या जागेवर दिसून आली नाही. त्यांनी इतर भागांमध्ये तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. अखेर वडिलांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- दोघांचे जबरदस्तीने धर्म परिवर्तन, उच्च न्यायालयाने प्रकरण CBI व NIA कडे सोपविले
- तु माझ्या दुकानाचे साहित्य चोरले म्हणत दुकानदाराला मारहाण
- पोलिसाने केली ‘टीसी’ला मारहाण
- तरुणीचा पाठलाग करीत काढली छेड, जमावाने दिला तरुणाला चोप
- Big Breaking : डी कंपनीसोबत नवाब मालिकांचे संबंध? दाऊदच्या लोकांसोबत मिळून व्यवहार केल्याचे न्यायालयाचे निरीक्षण
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज