जळगाव लाईव्ह न्यूज । आपला देश विविध आस्था धारणांचा देश आहे. सांप्रदायिक सद्भावना जोपासण्यासाठी सर्व धर्माची माहिती असणे आवश्यक आहे हर्ष व उत्साहाची पर्वणी रमजान ईद नुकतीच येथील गोदावरी अभियांत्रिकी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन जमाअत- ए – इस्लामी हिंद, जळगाव व सद्भावना मंच जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. सोहेल अमीर शेख (जिल्हाध्यक्ष जमाअत ए इस्लामी हिंद, इकरा कनिष्ठ महाविद्यालय, मेहरून) तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील हे उपस्थित होते तसेच मंचावर मुश्ताक शेख सर (शहर अध्यक्ष, जमाअत ए इस्लामी हिंद), मोहम्मद समी शेख (सचिव दावत विभाग, महाराष्ट्र राज्य) सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रफिक पटवे यांनी कुराण पठण केले व सुरेश भट यांची नाद (कविता) सादर केली.प्रास्ताविकात मुश्ताक शेख यांनी कार्यक्रमावे महत्व विषद करीत मार्गदर्शन करतांना या दिवसाचे औचित्य साधून आपल्या सर्वांच्या विचारांचे आदान-प्रदान होणे गरजेचे आहे तसेच विविध भाषा बोलणारे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस भारताची उन्नती होऊन भारताची विशालता दिसते. तसेच त्यांनी जमाअत ए हिंद व सद्भावना मंच यांच्या कार्या बद्दल माहिती दिली.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी महाविद्यालयात दरवर्षी इफ्तार पार्टी साजरी केली सर्व धर्माचे सण अतिशय साजरे केले जातात. आपण सर्वांनी सुख शांती व समाधानाने शिक्षण व जिवन व्यतीत करणे गरजेचे असल्याचा उददेश आहे असे सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. सोहेल शेख यांनी ईद चे महत्व विषद करीत रमजान महिना त्याग आणि तपस्याचा असून अतिशय पवित्र सण आहे. सर्व धर्म आणि पंथाचे लोक एकत्र येऊन सर्व सण साजरे करतो जेणेकरून एकता आणि परस्पर बंधुभाव टिकून राहतो. हा देश सर्वधर्म आणि वर्गाचा देश आहे. ईद म्हणजे फक्त चांगले कपडे परिधान करणे नसून प्रेम आणि ईश्वराशी जोडण्याचा मार्ग आहे. मोहम्मद समी शेख यांनी संबोधित करताना महात्मा गांधी यांचे विचार मांडले. जीवन जगत असताना आपले चरित्र व शील उत्तम असायला हवे. प्रत्येक मनुष्याने नैतिक पातळीवर काम करणे गरजेचे आहे. स्वतंत्र भारताची व्याख्या त्यांनी त्यांच्या शब्दात व्यक्त केली. अनेकता मे एकता तसेच युवाशक्ती यावर त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. समारोपा प्रसंगी शीरखुरमाचा आस्वाद घेतला. सदर कार्यक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील मॅडम यांनी कौतुक केले.यशस्वीतेसाठी प्रा. शफिकुर रहमान व डॉ.आसिफ खान (स्पोर्ट्स डायरेक्टर) यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन शेख वसीम हमीद (मिल्लत हायस्कूल) यांनी केले