⁠ 
रविवार, मे 5, 2024

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले कुटुंब भाजपात

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पारोळा माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळेसह डॉ. स्वप्नील शिरोळे भाजपात दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२४ । गेल्या वर्षभरापासून शिरोळे कुटुंबाचा भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे व डॉ. स्वप्नील शिरोळे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थिती आज भाजपात प्रवेश केला आहे.

महायुतीचे जळगाव लोकसभा उमेदवार स्मिता वाघ, रावेर लोकसभा उमेदवार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जळगाव येथे आले होते दरम्यान लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी पुतणे डॉ. स्वप्नील चंद्रकांत शिरोळे यांच्यासह भाजपा पक्षप्रवेश केला. गेल्या वर्षभरापासून शिरोळे कुटुंब भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

कोण आहेत पारोळ्यातील शिरोळे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंमसेवक तसेच खान्देशात आजवर राजकारणाचा प्रभाव असलेले शिरोळे कुटुंबाची ओळख आहे गोविंद एकनाथ शिरोळे हे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष म्हणून राजकीय कारकीर्द पार पाडली असून सन २०१९ ची विधानसभा देखील लढवीली होती. पारोळ्याच्या राजकारणात त्यांची महत्वाची भूमिका आहे. तसेच त्यांचे पुतणे वैद्यकीय सेवेत सेवा बजावत आहेत

उच्चशिक्षित स्मितभाषी डॉ स्वप्नील चंद्रकांत शिरोळे हे शिरोळे कुटुंबातील दुसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे. डॉ स्वप्नील हे राजकारणात कोरी पाटी असून माजी नगराध्यक्षा मनीषा शिरोळे यांचे ते चिरंजीव आहे, राजकीय वारसा डॉ. स्वप्नील शिरोळे यांना असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात उत्तम काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

राजकारणाचा बाळकडू हा जन्मताच लाभला आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार हे घरातून अनुभवायला मिळाले आहे अलीकडच्या गलिच्छ राजकरणात उच्चशिक्षित असून नव्हे तर चारित्र्यसंपन्न असणे गरजेचे असते. तसेच जाळगाव जिल्ह्यात बुद्धिबळाच्या पटलावर बाप बदलणारे आताचे प्यादे तिरपे चाल करून उंट होऊ पाहत आहेत अश्याना वेळीच वेसण घालण्यासाठी मी सक्रिय राजकरणात सक्रिय होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणावर मी पुढील काळात काम करणार आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती कर्तव्यपूर्वक पार पाडणार आहे.
-डॉ स्वंप्निल शिरोळे