⁠ 
सोमवार, मे 6, 2024

धक्कादायक : उष्माघाताने १६ वर्षीय मुलीचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । शिवरे दिगर येथील १६ वर्षीय मुलीचा उष्माघात व हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत भूषण पाटील यांनी खबरीत म्हटले आहे की, पूर्वा अमोल पाटील ही नववीचे शिक्षण घेत होती. शाळेतून परत येत असताना तिला १६ रोजी उष्माघात व हृदयविकाराचा त्रास झाला. पूर्वाला पारोळा कुटीर रुग्णालयात आणले असता डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले.