जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । मनपा मालकीच्या घरकुलांमधील रहिवाशांकडे १६ कोटींची थकबाकी आहे. ती वसुलीसाठी प्रशासनाने विशेष वसुली मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
पंधरा दिवसांत थकबाकीची रक्कम भरा अन्यथा घरकुले रिकामी करा असा इशारा देण्यात आला आहे. बुधवारपासून संबंधितांना नोटीस बजावण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. थकबाकी भरली नाही तर कारवाईला सामाेरे जावे लागेल, असा इशारा उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिला आहे.