जळगाव लाईव्ह न्यूज । सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील पाल येथील हरिण पैदास केंद्रात चाऱ्यातून विषबाधा झाल्याने ६ ते ९ फेब्रुवारी या चार दिवसात १४ हरणांचा मृत्यू झाला. मृत हरणांमध्ये पचनशक्ती क्षीण व घटसर्पाचेही लक्षण आढळून आले होते.

६ फेब्रुवारी रोजी हरणांचे शवविच्छेदन करून त्यांचा व्हिसेरा व खाऊ घातलेला चारा पाणी यांचे नमुने पुणे येथील शासकीय पशुरोग चिकित्सा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. दरम्यान, घटनेच्या तिसऱ्याच दिवशी दिवसभरात एका पाठोपाठ सहा तर चौथ्या दिवशी दोन हरणांचा अकस्मात मृत्यू झाला. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने वेळीच औषधोपचार केल्याने सात हरणांचा जीव वाचविण्यात यश आले आहे