---Advertisement---
भुसावळ जळगाव जिल्हा

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! भुसावळामार्गे धावणाऱ्या 12 रेल्वे गाड्या रद्द, 7 गाड्यांच्या मार्गात बदल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२५ । भुसावळ (Bhusawal Railway Station) विभागातून रेल्वेनं (Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) भुसावळ विभागातून (Bhusawal Division) धावणाऱ्या तब्बल १२ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तर रेल्वे प्रशासनाकडून सात रेल्वे गाड्यांचे मार्ग बदल केले आहे.

train Cancel

रेल्वे प्रशासनाने ऐनवेळी गाड्या रद्द केल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. कुंभमेळ्यामुळे (Mahakumbh Melava) उत्तर भारतात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गाड्या सुरु केल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत आहे.

---Advertisement---

या रेल्वे गाड्या रद्द?
रद्द केलेल्या गाड्यांमध्ये दादर-गोरखपूर विशेष गाडी २२, २३ व २५ रोजी दादरहून सुटणार नाही. गोरखपुर-दादर विशेष गाडी २४, २५ व २७ रोजी रद्द राहील. लोटिट-छपरा एक्स्प्रेस २२ व २५ रोजी रद्द असेल. छपरा-लोटिट एक्स्प्रेस २४ व २७ या दिवशी रद्द, सुरत-छपरा एक्स्प्रेस २३, २४ व २६ रोजी रद्द, छपरा-सुरत एक्स्प्रेस २५, २६ व २८ फेब्रुवारीला रद्द, लोटिट-गोरखपूर एक्स्प्रेस २५, २६ व २७ रोजी रद्द, दादर-बलिया विशेष गाडी २६ व २८ रोजी रद्द, उधना-बनारस एक्स्प्रेस २५ रोजी रद्द, बनारस-उधना एक्सप्रेस २६ रोजी रद्द, लोटिट-गोरखपूर एक्स्प्रेस २६ रोजी रद्द, गोरखपूर- लोटिट एक्स्प्रेस २८ रोजी रद्द केली आहे.

या ७ रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल
रेल्वे प्रशासनाकडून सात रेल्वे गाड्यांचे मार्ग बदल केले आहे. यात २५ रोजी उधना-दानापूर एक्स्प्रेस, २५ आणि २६ रोजी लोटिट-जयनगर एक्स्प्रेस, पुणे-दरभंगा एक्स्प्रेस २६ रोजी, जयनगर-लोटिट एक्स्प्रेस २५ आणि २६ रोजी, बनारस-पुणे एक्स्प्रेस २६ रोजी, दानापूर-उधना एक्स्प्रेस २६ रोजी, रांची -लोटिट एक्स्प्रेस या गाड्यांच्या मार्गात बदल केले असून, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment