⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

शिंदे गटातील नगरसेवकांना विकासकामांसाठी मिळाले ११ कोटी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । राज्यात एकनाथ शिंदे व भारतीय जनता पक्षाचे युतीचे सरकार आले आहे. यामुळे आता महानगरपालिकेतील राजकारण हे बदलताना पाहायला मिळत आहे. कारण राज्य शासनाकडून चेतन संकट, एड दिलीप पोकळे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे यांच्यासह काही प्रमुख नगरसेवकांच्या वॉर्डांसाठी अकरा कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे सर्व काम करण्यात येणार आहे. येत्या महासभेत या प्रस्तावावर प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे. यासाठी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेतील सभागृहात महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यात मूलभूत विकास कामांतर्गत शहरातील विविध पाच ठिकाणची विकास कामे शासन निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव सादर केला आहे. ज्या भागात हे कामे होणार आहेत ते प्रभाग शिंदे गटाच्या नगरसेवकांची आहेत.

याचबरोबर मनपाच्या घरकुलधारकांना अमृत योजना देण्यासाठी धोरण निश्चित केले जाणार आहे. प्रशासनाने याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यासोबतच शासनाने दिलेल्या २० कोटीच्या अनुदानातून शिल्लक पाच कोटी रुपयांमध्ये शहरातील विविध ठिकाणी शौचालय बांधण्यात येणार आहेत. याचबरोबर शिवाजीनगर उड्डाणपूल यावर नऊ मीटर उंचीचे पदवीधर लावले जाणार आहेत. त्यासाठी 31 लाखाच्या खर्चाला देखील या महासभेत मंजुरी देण्यात येणार आहे.

पर्यटन विभागाकडून मेहरून ठराव परिसरातील शिवाजी उद्यान सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी दहा कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळण्याबाबत विरोधी पक्ष नेत्यांची प्रस्ताव सादर केला आहे नियोजन समितीतून मिळणार नाही प्रभाकर दोन मधील विकास कामांसाठी देखील प्रस्ताव देण्यात आला आहे