फैजपुरात चोरट्यांचा ‘गॅस’वर डल्ला! गोदामातून १०० भरलेले सिलिंडर लंपास

एप्रिल 25, 2026 4:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडी, वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच फैजपूर शहराजवळील पिंपरुड रोड परिसरात असलेल्या ‘श्रीधर गॅस एजन्सी’च्या गोदामावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी धाड टाकत तब्बल १०० भरलेले गॅस सिलिंडर चोरून नाल्याची घटना आज शनिवारी (दि २५) सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल.

gas

नेमकी घटना काय?

फैजपूरातील पिंपरुड शिवारात ललित रघुनाथ राणे यांच्या मालकीचे भारत गॅसचे अधिकृत गोदाम आहे. शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी एजन्सीचे कर्मचारी आणि संचालकांच्या पत्नीने गोदाम सुरक्षितपणे बंद केले होते. त्यावेळी गोदामात १४.२ किलो वजनाचे एकूण २०९ भरलेले सिलिंडर साठवण्यात आले होते. मात्र, शनिवारी सकाळी कर्मचारी गोदाम उघडण्यासाठी आले असता, मुख्य गेटचे कुलूप तुटलेले असल्याचे दिसून आले.

गोदाम मालकांनी तातडीने पाहणी केली असता, एकूण साठ्यापैकी १०० सिलिंडर चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. एका सिलिंडरची किंमत ३,११८ रुपये असून, चोरट्यांनी एकूण ३ लाख ११ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरी गेलेले सर्व सिलिंडर भरलेले असल्याने, ते नेण्यासाठी चोरट्यांनी मोठ्या वाहनाचा वापर केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सध्या आखाती देशांमधील तणावामुळे भारतासह जगभरात गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. देशात गॅस टंचाईचे सावट असून नागरिकांना एका सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा संकटकाळात फैजपूरमधील ‘श्रीधर गॅस एजन्सी’च्या गोदामातून चोरट्यांनी चक्क १०० भरलेले सिलिंडर चोरून नेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी ललित राणे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now