श्रीराम नवमी निमित्त पालखी मिरवणूक उत्साहात

एप्रिल 10, 2022 8:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । श्रीराम नवमी निमित्त श्रीराम मंदिरा पासून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्रीराम भगवान यांची प्रतिमा पालखीत ठेऊन धार्मिक वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठा आड, इंदिरा गांधी चौक, संभाजी चौक येथे पालखीचे स्वागत करण्यात येऊन प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले व शांततेत श्रीराम भगवान यांचा जयघोष करीत अत्यांत शिस्तबद्ध रित्या हा पालखी सोहळा झाला.

palakhi jpg webp

दरम्यान गांधी चौकात पालखी आली असता या ठिकाणी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, शास्त्री भक्तीकिशोरदासजी महाराज, महंत सुरेशराज शास्त्री मानेकर बाबा राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी आदी येथे उपस्थित राहत पालखीचे दर्शन घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now