गुन्हेजळगाव जिल्हापारोळा

पारोळा येथे कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील कन्हेरे फाटा येथे दुचाकी व स्विफ्ट डिझायर कारच्या अपघातात दुचाकी चालक प्रवीण पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास पारोळा कुटीर रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ धुळे येथे हलवले आहे.

accident jpg webp

तालुक्यातील कन्हेरे फाट्यावरील महामार्ग सहावर कन्हेरे गावाकडून प्रवीण पाटील हे त्यांची दुचाकी (एमएच- १९, एडी- ४३२८) वरुन पारोळ्याकडे जात हाेते. याचवेळी जळगावकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार (एमएच- १८, एसी- २०६४) ने जबर धडक दिल्याने प्रवीण पाटील जखमी झाले. याबाबत उशिरापर्यंत पारोळा पोलिसांत नोंद झाली नव्हती.

    Related Articles

    Back to top button