धक्कादायक : सट्टयाचा आकडा न सांगितल्याने तरुणाच्या डोक्यात टाकली फरशी

ऑक्टोबर 14, 2022 10:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरात सुरू असलेले सट्टयाचे अड्डे काही लपून राहिलेले नाही. बुधवारी रात्री चेतनदास हॉस्पिटलजवळ एक धक्कादायक प्रकार घडला असून सट्टयाचा आकडा कोणता येणार हे न सांगितल्याने तरुणाच्या डोक्यात फरशी टाकून त्याला मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 09 03T132219.635 jpg webp

जळगाव शहरात अनेक ठिकाणी सट्टा, पत्ता जुगार अड्डे बिनधास्तपणे सुरू आहे. अनेक वेळा पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्यानंतर देखील ते अड्डे सुरूच आहेत. शहरातील नवल कॉलनीत राहणारे नरेश मोहन जावळे हे मनपात नोकरीला आहेत. बुधवार दि.१२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास चेतनदास मेहता हॉस्पिटलसमोरून नरेश जावळे हे जात असताना तिघांनी त्यांना अडवले.

तिघांनी नरेश यांना सट्टयाचा आकडा कोणता येणार याबाबत विचारणा केली. मला याबाबत माहिती नसून तुम्ही मला का विचारता असे सांगितल्याने मोईन शहा याने त्यांच्या डोक्यात फरशी टाकून दुखापत केली. तसेच सोनू आणि आणखी एका अज्ञात तरुणाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत नरेश जावळे जखमी झाले असून त्यांनी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नितीन पाटील करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now