⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

‘या’ राज्याचा स्तुत्य निर्णय : नागरिकांना ३०० युनिट वीज माेफत

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । नुकतेच सरकार स्थापन झालेल्या पंजाबमध्ये आम आदमी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे घरगुती ग्राहकांना १ जुलैपासून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी ही घोषणा केली. आपने निवडणूक जाहीरनाम्यात मोफत विजेचे आश्वासन दिले होते. ११७ पैकी ९२ जागा जिंकून सरकार बनवणाऱ्या आप सरकारला १ महिना पूर्ण झाला आहे. मोफत वीज वापरासाठी एक अट आहे. दोन महिन्यांत ६०० युनिटपेक्षा अधिक वापर झाला तर ग्राहकाला पूर्ण बिल भरावे लागेल.

तथापि, अनुसूचित जाती, मागास वर्ग, बीपीएल कुटुंबे आणि स्वातंत्र्यसैनिकांना ६०० युनिटपेक्षा जास्त वापराचेच बिल भरावे लागेल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ५ हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. सूत्रांनी सांगितले की, मान यांनी मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची भेट घेतली होती. दोघांत ३०० युनिट मोफत वीज देण्यावर चर्चा झाली होती.