⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | यावलमध्ये हीन दर्जाच्या पाईपमुळे वारंवार पाणी रस्त्यावर

यावलमध्ये हीन दर्जाच्या पाईपमुळे वारंवार पाणी रस्त्यावर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहारत नगर पालिका हद्दीतील विविध ठिकाणी नवीन पाणी पाईप लाईन टाकण्यात आले आहे. काही ठिकाणी व्यवस्थित पणे पाणी येत नसल्याने नागरिकांची तक्रार होती. त्यानुसार विविध ठिकाणी जॉईट पाईप लाऊन त्या भागात पाणी पुरवठा सोई करण्यात आले आहे. नुकतेच गंगा नगर आणि गणपती नगर व आयेशा नगर येथे मुख्य मार्गावर या जॉइंट लावण्यात आले असून गणपती नगर व आयेशा नगर येथे पाणी वाहत राहते. त्यामुळे व्यवस्थित पाणी येत नाही अशी तक्रार गंगा नगर येथील रहिवासी यांनी केली होती. त्या बाबत गणपती नगर व आयेशा नगर येथे मुख्य मार्गावर पाणी पाईप लाईनला जॉइंट लावण्यात आले होते. पण सदर जॉइंट वारंवार निघत आहे. त्यामुळे
पाणी रस्त्यावर येवून पायी चालणाऱ्या नागरिकांना त्रास भोगावा लागत असून नगरपरिषद याकडे लक्ष देईल का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

युवक काँग्रेस चे यावल रावेर विधानसभा अध्यक्ष फैजान शाह यांनी तुटलेले जॉइंट ला जोडण्या साठी तोंडी अर्ज मुख्याधिकारी यावल नगर परिषद यांच्याकडे केले होते. मात्र, नगरपरिषदेने दखल न घेतल्यामुळे सदर अर्जाची लेखी तक्रार शाह यांनी पुन्हा दि. २१ रोजी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष फैजान शाह, आदिल शे.नसीम,कपिल खान,अनवर खान,सरफराज शाह,आदिल सय्यद, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह