जळगाव जिल्हाजळगाव शहर

महापालिका रुग्णालयांना ११००, तर जिल्हा रुग्णालयाला ५०० डोसचे वितरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२३ । गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या कोविशिल्ड लसचे जिल्ह्यासाठी १२ हजार डोस आले असून त्याचे आरोग्य केंद्रांना वितरण करण्यात आले. मनपा रुग्णालयांसाठी एक हजार १०० डोस, तर जिल्हा रुग्णालयाला ५०० डोस देण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांना लसीचे वितरण करण्यात आले.

चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर आपल्याकडेही बूस्टर डोससह ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डोस घेतलेला नाही त्यांना लसीकरणाचे आवाहन केले जात होते. त्यात बहुतांशजणांनी अगोदर कोविशिल्ड लस घेतलेली असल्याने बूस्टर डोस घ्यायचा असला शकत नव्हता. तरी ही लस उपलब्ध नसल्याने लस घेता येत नव्हती.आता अखेर १२ हजार डोस आल्याने जिल्ह्यात लसीकरणही सुरू करण्यात आले .

” जिल्ह्यात कोविशिल्डसह आता कोव्हॅक्सिनचे १९ हजार डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस घेतला आहे, त्यांना पुढील डोस घेता येणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button