⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मनपा झाली मालामाल : नागरिकांकडून केली ‘इतक्या’ कोटींची वसुली

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । महापालिकेने शहरातील मालमत्ताधारकांना ऑडव्हान्स कर दिली जात आहे. त्यामुळे सवलत सुरु झाल्यापासून चार महिन्यात एकुण २ हजार ९०१८ एकूण २९ हजार १८ मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्तांचा कर ऑडव्हान्स भरून सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत २६ कोटी ९ लाख ६० हजार रुपयांचा भरणार झालेला असून महापालिका मालामाल झाली आहे.

शहरातील मालमत्ताधारकांना करभरणा वाढविण्यासाठी महापालिकेकडून सवलत योजना जाहीर केली आहे. या सवलत योजनेत ३१ जुलै २०२२ पर्यंत कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना १० टक्के सवलत दिली जात आहे. तसेच महिलांच्या नावावर मालमत्ता असल्यास त्या महिलांना आणखी ५ टक्के सवलत (सुट) दिली जात आहे. त्यामुळे महिलांना एकुण १५ टक्के सवलतीचा लाभ होत असल्यामुळे ३०० महिलांनी या सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. सदर सवलत योजना ३१ जुलैपर्यंत सुरु राहणार असल्यामुळे येणाऱ्या काही दिवसात दिवसात शहरातील नागरिकांना सवलत योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती मनपाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मनपाची कर वसुली वाढविण्यासाठी सदर सवलत योजना सुरु केली होती. त्यास जळगाव शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

इतिहासात पहिल्यांदा विक्रमी वसुली
यंदा २६ कोटी ९ लाख ६० हजार इतकी विक्रमी वसुली झाली आहे. यामध्ये ८ कोटी ६० लाख ४६ हजार तर, प्रभाग समिती क्रमांक २ कार्यालयामध्ये ३ कोळी ९५ लाख ७५ हजार इतकी तसेच प्रभाग कमांक ३ कार्यालयात ५ कोटी ६७ लाख ९,८२९ व प्रभाग समिती क्रमांक ४ कार्यालयात ७ कोटी ८६ लाख २८ हजार ७४८ रुपये इतका कर भरणा झाला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठ्याप्रमाणात कर भरणार चार महिन्यात झाला आहे.