तुमचं दारू प्यायचं वय आहे का? विचारताच मुलांनी दगडाने ठेचून केला खून
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२० । हे तुमचं दारू प्यायच वय आहे का? असा प्रश्न 9 एप्रिलच्या दुपारी दिनेश पाटील यांनी दोन वयाने लहान असलेल्या मुलांना विचारला. यामुळे राग आल्याने त्या दोघांनी दिनेश पाटील यांचा डोक्यात दगड घालून खून केला. अशी धक्कादायक माहिती पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आली.
मेहरू येथे 9 एप्रिल रोजी दिनेश पाटील या इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. खून करणारे गुन्हेगार गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या हाती लागत नव्हते.मात्र अखेर या खुनाचा छडा लागला असून, हा खोल दोन जणांनी केल्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ज्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
आनंद माळी वय 21, व एका पंधरा वर्षाच्या मुलानी मिळून दिनेश पाटील यांचा खून केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनेश पाटील हे दारू प्यायला बसले होते. त्यांच्यासमोर एका भिंतीखाली आनंद माळी व त्याचा मित्र दारू प्यायला बसला होता. अचानक दिनेश पाटील यांनी हे तुमचं दारू प्यायचं वय आहे का असा प्रश्न विचारला व त्याचा राग आल्याने या दोघा मुलांनी दिनेश पाटील यांचा खून केला.
यांनी गुन्हा उघड केला
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल देवडे, अशोक महाजन, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, राहुल पाटील, विजय पाटील, प्रीतम पाटील, भरत पाटील, विजय चौधरी, दर्शन ढाकणे यांनी शोध घेतला.