⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

जळगावात गॅस सिलिंडरचा काळा बाजार करणारी टोळी जाळ्यात ; साडे तीन लाखाच्या मुद्देमाल जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२३ । जळगावात शहरात घरगुती गॅसचा काळा बाजार उघडकीस आला असून त्याठिकाणाहून पोलिसांनी हजारो रुपयांचा गॅस भरण्याचे साहित्य व सिलेंडर जप्त केले. याप्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मिळचाळ भागात शाळा क्रमांक १० जवळ घरगुती वापराची गॅस सिलिंडरची गाडी काळ्या बाजारात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांना मिळल्यावरून त्यांनी पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, हितेश बेहरे, भटूसिंग तोमर, मेघराज महाजन, गणेश पाटील यांना पाठवले.

त्याठिकाणी पोलिसांनी छापा मारून ४९ हजार ८०० रुपये किमतीचे ३० भरलेले सिलिंडर आणि १ खाली तर तीन लाख रुपये किमतीची गाडी व त्यात भरलेले १० सिलिंडर, ६ हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक पंप, १५०० रुपयांचा इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण ३ लाख ५७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अन्वर नुरोद्दीन भिस्ती (वय ४६, रा. शाहूनगर) व फिरोज खान सलीम खान (वय २७, रा. काट्या फाईल नॅशनल जीमजवळ) या दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास किशोर निकुंभ हे करीत आहे.