तरुणास हत्यारांनी मारहाण करणारी गॅंग गजाआड

जुलै 10, 2022 11:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । जुन्या भांडणाचा वाद उकरुन तरुणास शिवीगाळ व घातक हत्यारांनी मारहाण करणा-या गँगला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील एक जण पसार असून त्याचाही शोध आहे. दरम्यान, अटकेतील आरोपीना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

crime 2022 07 10T111638.813

हर्षल राजेंद्र सोनवणे व त्याचा साथीदार समाधान सुनिल पवार असे दोघे जण 2 जुलै रोजी मोटार सायकलने कुसुंबा येथून जळगावच्या दिशेने येत होते. वाटेत रायपूर फाट्याजवळ करण चंद्रशेखर पाटील रा. गणपती नगर कुसुंबा -जळगाव, तुषार प्रमोद कोळी रा. दत्त मंदीरामागे कुसुंबा-जळगाव, अमित अशोक तडवी रा. कुसुंबा, सुनिल उर्फ सोन्या गुलाब चव्हाण रा. स्वामी समर्थ केंद्राच्या मागे जळगाव, सागर तिरसिंग पाटील रा. कुसुंबा, गणेश उर्फ विक्की गोसावी व इतर अशा सर्वांनी हर्षलची मोटार सायकल अडवली. जुन्या भांडणाचा वाद उकरुन काढत सर्वांनी हर्षल यास अश्लिल शिवीगाळ सुरु केली. करण, तुषार, अमित, सुनिल, सागर, गणेश व इतरांनी त्यांच्या हातातील केबल प्लॅस्टीक पाईप व लाकडी काठी तसेच बिअरची बाटली अशा घातक हत्यारांनी हर्षलच्या हातापायासह अंगावर मारुन त्यास गंभीर जखमी केले. दरम्यान तुषार कोळी याने त्याच्या हातातील बिअरची काचेची बाटली हर्षलच्या तोंडावर फेकून मारल्याने त्याचा एक दात तुटून चेहरा विद्रुप झाला.

सामान्य रुग्णालयात उपचार घेत असतांना हर्षलने दिलेल्या फिर्यादीनुसार सर्व आरोपींविरुद्ध भा.द.वि. 326, 325, 323, 341, 294, 504, 143, 149, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमांचे स्वरुप बघता या गुन्ह्यात 326 हे कलम वाढवण्यात आले आहे. यातील करण, तुषार, अमित, सुनिल, सागर अशा पाच जणांना 8 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. गणेश उर्फ विक्की गोसावी हा फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. अटकेतील सर्वांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक अनिस शेख करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now