जळगावकरांनो स्वेटर विकत घेण्याआधी ‘ही’ बातमी नक्की वाचाच
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२२ । गेल्या काही दिवसांपासून बाजारात मोठी महागाई पाहायला मिळत आहे. युक्रेन आणि रशिया युद्धाच्या अहवाल देत गेल्या काही महिन्यांपासून बाजारातील सर्वच गोष्टी महागल्या आहेत. मात्र स्वेटरच्या किमतीत काही वाढ झाली नाहीये.
सध्या सकाळच्या आणि रात्रीच्या वेळी थंडी जाणवू लागली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा जोर वाढू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे थंडीचे आगमन होताच स्वेटर, मफलर, कानाचे पट्टे, टोप्या आणि इतर उबदार वस्तूंची मागणी सध्या बाजारात जोर धरून आहे. त्यांची दुकानही शहरात लागली आहेत. मात्र चांगली अशी बातमी कि, यंदा स्वेटरच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नाहीये
बाजारात प्रत्येक स्वेटर हा लोकरीचा म्हणून विकला जातो. मात्र खरे लोकर धुतल्यावर आखडते. तिचा धागा भरतो धागा भरल्यामुळे थंडीपासून बचाव होतो. अधिक चांगली उब मिळते. कपडे उबदार व्हावेत किंवा ते आखडू नयेत म्हणून जापानहून आयात केलेला एक विशिष्ट धागा यासाठी वापरला जातो याला फर वूलन म्हणतात
पूर्वीच्या काळात स्वेटर व इतर कपडे हाताने विणले जायचे पण नवीन पिढी मोठ्या उत्पादन कंपन्यांकडून ठाऊक खरेदी करून लुधियाना, दिल्ली, कोलकत्ता , सिलिगुडी येथून मालं विकत घेत आहे. मात्र सॉक्स टोप्या व काही प्रमाणात स्वेटर आजही हाताने विणले जात आहे.