जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्य शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुनश्च सहा महीन्यांची मुदत वाढ मिळाली आहे.
निवडणूका नियत झालेल्या राज्यातील बाजार क्षेत्रात काम करणाऱ्या कृषी पत संस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या निवडणुका पुनश्च ९ मार्च २०२१ पासून ते ८ / ९ / २०२१ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचे शासन आदेश जयंत भोईर कार्यसन अधिकारी , महाराष्ट्र शासन यांचे पत्र प्राप्त झाले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने व चोपडा व यावल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे,आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने यावल कृषी उत्पन्न बाजार समितीला पुनश्च सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारी संचालक मंडळाची मुदतही ८/ ९ / २०२० रोजी संपुष्टात आली असून, कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६४ कलम१४ (३) अनुसार शासन नियमा अधिकाराचा वापर करीत १७ /९ /२०२० रोजीच्या आदेशान्वये ८ / ३ / २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्यात पुनश्च उदभवलेल्या कोरोना विषाणु( कोवीड१९च्या गंभीर परिस्थितीचा विचार करता संसर्ग विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात प्रबळ अमलबजावणी सुरू आहे. निवडणुका नियत झालेल्या राज्यातील बाजार क्षेत्रात काम करणाऱ्या कृषी पत संस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या निवडणुका पुनश्च ९ मार्च २०२१पासुन ते ८ / ९ / २०२१पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचे शासन आदेश जयंत भोईर कार्यसन अधिकारी , महाराष्ट्र शासन यांचे पत्र प्राप्त झाले आहे.