⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

चुकीच्या पद्धतीने आकारलेली घरपट्टी रद्द करा अन्यथा मोठे आंदोलन करू – आ सुरेश भोळे

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । भा ज पा जळगाव जिल्हा महानगर तर्फे वाढीव घरपट्री च्या निषेधार्थ भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा चे नेतृत्व जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजु मामा) यांनी केले. मोर्चाची सुरवात भा ज पा कार्यालय वसंत स्मृति येथुन घाणेकर, सुभाष चौक, दाणा बाजार, चित्रा ,व जयप्रकाश नारायण चौक मार्ग महानगर पालिका येथे समारोप झाला. जिल्हा महानगर पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, आघाडीचे अध्यक्ष, कार्यकर्ते, व्यापार, उद्योगजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा मधे मनपा प्रशासन व सत्ताधारी पक्षाचा निषेध व धिकार करण्यात आला.डून जळगाव शहरातील नागरिकांना प्राथमिक सुख-सुविधा पुरवल्या जात नसताना आपण ही कर वाढ करणे योग्य होणार नाही.
सद्यस्थितीत जळगाव शहरात गटारी स्वच्छता नाही, रस्ते सुव्यवस्थित नाही, पाण्याची सुविधा नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असताना अशा प्रकारे वाढीव व अवाजवी घरपट्टी आकारणी करून त्यानुसार वाढीव अवाजवी बिले वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनआक्रोश आहे.


आम्ही प्रशासनाला जागृत करीत आहोत की, नागरिकांनी घेतलेल्या हरकती व भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची आजही दखल न घेतल्यास आज फक्त जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानंतर मोठ्या संख्येने तीव्र प्रमाणात उपोषण करण्यात येईल. याची दखल घ्यावी असे जळगाव जिल्हा अध्यक्ष व आ सुरेश भोळे (राजु मामा) यांनी जन आक्रोश मोर्चाच्या समारोप प्रसंगी सांगितले
सदरिल मोर्चाला खा उन्मेश पाटील, प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ, जिल्हा महानगरअध्यक्ष दिपक सुर्यवंशी, जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हा सरचिटणीस डॉ राधेश्याम चौधरी ,उद्योग आघाडीचे नितीन इंगळे यांनी संबौधित केले व नंत र म न पा आयुक्त यांना कार्यकर्ते च्या जन आक्रोश पाहुन १७ मजली च्या तळ मजल्यावर बसलेल्या पदाधिकारी चर्चा केली व निवेदनं स्विकारले