---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र

कांद्याला भाव मिळणारच ! कसा ? मुख्यमंत्र्यांनी दिली हि महिती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ । गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण करताना, राज्यातील सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे.

यावेळी शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार आहे. म्हणून आम्ही निकर्ष आणि नियम डावलून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

ekath shinde kanda jpg webp webp


कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत सरकारपूर्णपणे पाठीशी उभं आहे. आता नाफेडनं कांदा खरेदी सुरू केली आहे. ज्या ठिकाणी खरेदी सुरू झाली नसेल ती सुरू केली जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात बोलताना दिलं आहे.

विरोधक आक्रमक
सरकार विरोधात घोषणा दिल्या. ‘कांदा कापूसचे हाल काय, शिंदे फडणवीस हाय हाय’, ‘कांद्याला भाव मिळालाच पाहिजे’, ‘कांदा खरेदी केंद्रे सुरु झालीच पाहिजेत’, अशा घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, पृथ्वीराज देशमुख, अनिल देशमुख यांच्यासह विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून दिल्या

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---