⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

एरंडोल शहरात माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीमेस प्रारंभ

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२१ । एरंडोल शहरात कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाची सुरवात एरंडोल शहरातील प्रथम नागरीक लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांच्या घरापासून आज दि.२८ पासून करण्यात आली आहे.

“माझे कुटुब, माझी जबाबदारी” या मोहिमेचा कालावधी दि.२८ एप्रिल ते ०२ मेपर्यंत राहील. या कालावधीत एरंडोल शहरातील ५० पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचे सखोल आरोग्य परीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी एरडोल शहरात एकूण २० पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.सदर पथकामार्फत शहरातील प्रत्येक घरी भेट देऊन ५० पेक्षा अधिक वय

असलेल्या व्यक्तीची प्राथमिक आरोग्य तपासणी करतील. यामध्ये मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारख्या महत्वाच्या comorbid condition असणाऱ्या व्यक्ती शोधून काढणे, अशा activities करण्यात येतील. मोहीम कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्तीस आरोग्य व कोवीड प्रतिबंधाचे संदेश

देण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक घरातील सर्व सदस्याची तपासणी करण्यात येईल, कोरोना या साथरोगाचे लवकर निदान झाल्यास रुग्ण औषधोपचाराने बरा होतो, परंतु लक्षणाकडे व आजाराकडे दुर्लक्ष केल्यास रोग बळावतो व रुग्ण गंभीर अवस्थेत जावून रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

एरडोल शहरातील सर्व नागरिकांना लोकनियुक्त नगराध्यक्ष, उपविभागीय दंडाधिकारी एरडोल भाग. तहसीलदार, मुख्याधिकारी, सन्माननीय नगरसेवक/नगरसेविका यांच्याकडून आवाहन करण्यात येते की, आपल्या घरी भेट देणाऱ्या पथकांना सहकार्य करून त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्याची परिपूर्ण माहिती द्यावी व आपल्या कुटुंबाचा कोरोना या साथरोगापासून बचाव करावा.