⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

आयुक्त ऍक्शनमोड मध्ये : मनपाची केली पाहणी


जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२३ । जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार देविदास पवार यांनी महिनाभरापूर्वी हाती घेतला. त्यानंतर प्रथमच आयुक्तांनी अचानक मनपा प्रशासकीय इमारतीच्या विविध विभागांमध्ये जाऊन पहाणी केली.

यावेळी त्यांनी कर्मचारी जागेवर आहे की नाही ? तसेच प्रत्येक विभागातील व मजल्यावर स्वच्छतेची पहाणी करून सूचना दिल्या. जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी मनपातील विभागात जाऊन पहाणी केली. यावेळी सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील सोबत होते.

पहाणी प्रसंगी, विभाग प्रमुख तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी विभागामध्ये चालणाऱ्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. त्यामुळे अचानक आयुक्तांचा विभागांना भेट व पहाणी केल्यामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली होती.

आयुक्त पवार यांनी अचानक दिलेल्या भेटीदरम्यान प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांकडून काय काम केले जाते ? तसेच कामांचे स्वरूप आदी कार्यालयीन माहिती जाणून घेत काम अधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल. याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. सोबतच स्वच्छतेची आपली जवाबदारी आहे, असे आयुक्त पवार यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना सांगितली.