महापौर जयश्री महाजन इन ऍक्शन मोड ! मनपात घेणार आढावा

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ जानेवारी २०२३ | महापौर जयश्री महाजन या आज अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी त्या मनपातील प्रत्येक विभागाला देण्यात आलेल्या कामाचे यादीनिहाय उद्दिष्ट पूर्ण झाले आहे कि नाही? याची माहिती घेणार आहेत. आणि कामे झाली नाहीत तर ती का झाली नाहीत याची माहिती घेणार आहेत.

महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात सकाळी अकराला बैठक होणार आहे. ही बैठक विभागनिहाय होणार असून, त्या दिवशी कोणत्याही अधिकाऱ्यांना सुटी देऊ नये, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली आहे.

महापौर जयश्री महाजन यांनी दोन महिन्यापूर्वी म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२२ रोजी दिवसभर आढावा बैठक घेतली होती.यावेळी त्यांनी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाचे यादीनिहाय उद्दिष्ट दिले होते. या कामांची आपण पूर्तता करून अहवाल तयार करावा, असेही त्यांना सांगितले होते. त्यानुसार आता दोन महिने पूर्ण होत असून, त्या सर्व कामांचा आढावा प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जाणार आहे.