तरुणाला न्यूड कॉल करीत महिलेने मागितली खंडणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२२ । ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात अडकवून धरणगावातील तरुणाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याची बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वीदेखील काही लोकांसोबत याआधी देखील न्यूड व्हिडीओ कॉल केल्याचे प्रकार घडले आहेत.

तक्रारीची धमकी देत न्यूड कॉल झाले बंद
पीडित तरुणाला काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर काही मेसेज करण्यात आल्यानंतर आरोपी महिलेने पीडित तरूणासोबत मैत्री केली. यानंतर अचानक तिने शनिवारी रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान पीडीत तरुणाला विवस्त्र (न्यूड) अवस्थेत व्हिडीओ कॉल केला. तिने पीडित तरुणाला व्हिडीओ फ्रेममध्ये घेऊन संबंधित कॉल रेकॉर्ड केला. व्हिडीओ कॉलनंतर आरोपी महिलेनं पीडित व्यक्तीला व्हाईस कॉल केला आणि पैशांची मागणी केली परंतु पीडीत तरुणाने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यामुळे आरोपी महिलेचे व अन्य एकाचे येणारे कॉल बंद झाल्याचे सांगण्यात आले.