गुन्हेधरणगाव

नातेवाईक असल्याचे भासवून पैसे हिसकावले; आरोपी जेरबंद, ८ हजार रुपये हस्तगत

जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव येथील आठवडे बाजारात एका व्यक्तीला आपला जवळचा नातेवाईक असल्याचे भासवून त्याच्याकडील रोख रक्कम हिसकावून नेल्याच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणात दिगंबर कौतिक मानकर (रा. शिवशंकर नगर, असोदा रोड, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून ८ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी धरणगाव येथील आठवडे बाजारात खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी एका अज्ञात इसमाने फिर्यादी यांना आपला जवळचा नातेवाईक असल्याचे भासवले. त्यानंतर त्यांच्याकडील सुमारे ८,५०० रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेत आरोपी पसार झाला.

याप्रकरणी २९ सप्टेंबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना आरोपीचा शोध घेऊन चोरीची रक्कम हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार LCB पथकाने घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी दिगंबर कौतिक मानकर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडून ८,००० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी धरणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ विष्णू बिहऱ्हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, हरिलाल पाटील, निलेश सोनवणे, राहुल कोळी आणि विलास गायकवाड यांचा समावेश होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button