⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

उद्योग आघाडी भाजपाच्या पाचोरा तालुकाध्यक्षपदी सचिन संचेती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । पाचोरा येथील भाजपच्या उद्योग आघाडीच्या नियुक्त्या घोषित करण्यात आल्या असून तालुकाध्यक्षपदी सुशील डेअरीचे संचालक सचिन संचेती व शहराध्यक्षपदी रोडीलाल छगनलाल अग्रवाल अन्नधान्य प्रोसेसिंग कंपनीचे संचालक तथा अग्रवाल समाजाचे अध्यक्ष सिताराम उर्फ मुन्ना अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश (राजू मामा) भोळे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरजी अग्रवाल व तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नियुक्ती आली. या नियुक्तीमुळे उद्योजक व व्यापारीवर्गासह सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. दरम्यान, आगामी काळात पाचोर्‍यातील उद्योग क्षेत्रात उद्योजकांसह कर्मचारी कामगारांना येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू तसेच पाचोरा शहरासह तालुक्याच्या विकासासाठी नव-नवीन उद्योगांना कशा पद्धतीने चालना देता येईल यासाठी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी सतत प्रयत्नशील राहील असे उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष सचिन संचेती व शहराध्यक्ष मुन्ना अग्रवाल यांनी बोलताना सांगितले.

या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पान-पाटील उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरजी अग्रवाल व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन शहराध्यक्ष रमेश वाणी सरचिटणीस गोविंद शेलार दीपक माने भावेश चौधरी भैय्या ठाकूर आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.