⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

जि.प शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावतोय; सरोदे

जळगाव लाईव्ह न्युज । १४ एप्रिल २०२२ । जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा हा पालकांच्या सहकार्याने उंचावतो असल्याचे प्रतिपादन जामनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांनी केले.

टाकरखेडा जि.प मराठी शाळेत नुकताच शाळापूर्व तयारी मेळावा तसेच कला आणि कार्यानुभव वस्तूंचे प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी ते बोलत होते. पालकांसमोर बोलतांना ते म्हणाले की, सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत इयत्ता पहिली मध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यांची नावे शाळेत दाखल करण्यासाठी पालकांनी शिक्षकांना सहकार्य करावे. शाळापूर्व तयारी मेळाव्यात शिक्षकांनी दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना मांडलेल्या विविध स्टॉल मधून सविस्तर माहिती दिली.

यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी पुठ्ठ्यांपासून, माती पासून, विविध पाने फुलांपासून आणि कागदाच्या लगद्यांपासून टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ अश्या कला व कार्यानुभव वस्तूंची मांडणी केलेली होती. याबाबत मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी कला व कार्यानुभव मांडलेल्या वस्तुं विषयी माहिती सांगितली.

कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर, उपाध्यक्ष रुपाली आगळे, सदस्य शिवाजी डोंगरे, सुधाकर गोसावी, ज्योती आगळे, पोलीस पाटील समाधान पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, तसेच दाखलपात्र विद्यार्थ्यांचे पालक आदी उपस्थित होते. शाळापूर्व तयारी मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेतील उपशिक्षक देवाजी पाटील, रवींद्र चौधरी, जयंत शेळके, जयश्री पाटील, छाया पारधे, ज्योती उंबरकर, रामेश्वर आहेर तसेच अंगणवाडी सेविका अरूणाताई पाटील, कविता डोंगरे, मुख्याध्यापक पी.टी.पाटील इत्यादींनी परिश्रम घेतले.