भाज्यपाल कोश्यारी विरोधात युवासेनेची स्वाक्षरी मोहीम
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतून राजस्थानी व गुजराती लोक जर बाहेर पडले तर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य केले होते. मात्र, या वक्तव्यामुळे राज्यपाल कोश्यारी चांगलेच लोकांचा नजरेत आहे आहेत. त्यांनी केलेल्या या वक्त्यव्यामुळे त्यांच्याविरोधात महाराट्राभर निषेध केला जात आहे. जळगावात देखील राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात युवासेना महानगरतर्फे आज रविवारी शहरातील काव्यरत्नवली चौक व नेहरू चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “भगतसिंग कोश्यारी यांचा धिक्कार असो…”, “या राज्यपालाचं करायचा काय ? खालती डोकं वरती पाय…” अश्या घोषणा देखील देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, महानगर युवाधिकारी विशाल वाणी, उपजिल्हा युवाधिकारी पियुष गांधी, अमित जगताप, प्रीतम शिंदे, अमोल मोरे, राहुल पोतदार, जय मेहता, अभिजित रंधे, सागर कुटुंबळे, महेश ठाकूर, गणेश गायकवाड, प्रशांत फाळके, उमेश चौधरी, गिरीश चौधरी, पंकज जोशी, निलेश जोशी, विलास पवार, बन्सी माळी, वासिम खान, ललित धांडे आदी उपस्थितीत होते.