Friday, December 9, 2022

आदर्श विवाह : पहिल्यांदाच पार पडला आंतरजातीय मूकबधीर दांपत्याचा लग्न सोहळा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । जिल्ह्यात आजवर अनेक आदर्श विवाह सोहळे पार पडले आहेत परंतु पहिल्यांदाच एक अनोखा आदर्श विवाह पार पडला आहे. सावखेडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान मूकबधिर विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका मूकबधिर दांपत्याचा आंतरजातीय विवाह सोहळा बुधवारी पार पडला. दोन्ही कुटुंबियांनी समन्वय साधल्याने हा सोहळा जल्लोषात संपन्न झाला.

- Advertisement -

सावखेडा येथील विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये हेमलता नाथ व हर्षल जैस्वाल दोन्ही शिक्षण घेत होते. दोघांची ओळख असल्याने हेमलताचे कला शाम वंजारे, शाम वंजारे, गजानन गायकवाड तसेच हर्षलचे आजोबा बबनराव जैस्वाल, वडील रवींद्र जैस्वाल यांनी समन्वय साधत दोघांची लग्नगाठ बांधण्याचे निश्चित केले. वर-वधू आणि कुटुंबियांकडून होकार मिळाल्यानंतर दि.२९ डिसेंबर २०२१ रोजी चि.सौ.का.हेमलता नाथ व चिरंजीव हर्षल जैस्वाल यांचा आंतरजातीय विवाह सोहळा पार पडला.

विवाह सोहळ्यासाठी हेमरत्न साळुंखे, अतुल हराल, माजी नगरसेवक चेतन शिरसाळे, शिवसेनेचे राहुल नेतलेकर, विजय अभंगे, नाथ समाजाचे रवींद्र मोरे, फिरोज पठाण, शशिकांत बागडे, नितीन तमायचे, योगेश बागडे, कपिल बागडे, कुणाल बागडे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी अनमोल सहकार्य केले. तसेच विवेकानंद प्रतिष्ठान मूकबधिर विद्यालयाचे पद्माकर इंगळे, शिक्षिका विद्या वैद, ज्योती खानोरे, नीता ढाके यांचे विशेष सहकार्य लाभले.

- Advertisement -

हे देखील वाचा :

- Advertisement -
[adinserter block="2"]