पाचोरा : वारंवार आवाज देऊन प्रतिसाद मिळेना; खोलीत डोकावून बघताच वाहिनीने फोडला हंबरडा..

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२३ । पाचोरा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथील मोंढाळे रोडवरील गजानन नगर भागातील एका ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलीय. किरण रघुनाथ महाजन (वय – ३५) असे मृत तरुणाचे नाव असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. दरम्यान, किरणने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

काय आहे नेमकी घटना?

पाचोरा शहरातील रेल्वेस्थानका जवळ असलेल्या हाॅटेल चंद्रलोक मध्ये प्रसिद्ध आचारी म्हणून काम करणारे किरण महाजन हे २० फेब्रुवारी रोजी आपले दैनंदिन काम आटोपून दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास आपल्या गजानन नगर भागातील घरी आले. दरम्यान काही वेळानंतर त्यांच्या वहिणी यांनी किरण यांना जेवण करण्यासाठी बोलविले असता किरण यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. वारंवार आवाज देवुन सुद्धा खोलीतुन प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या वहिणींनी खिडकीतुन आत डोकावून बघितले असता किरण हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन येताच वहिणी यांनी एकच आक्रोश केला.

शेजाऱ्यांच्या मदतीने किरण महाजन यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी किरण महाजन यांना मृत घोषित केले. दरम्यान, किरण महाजन यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली