⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | गुन्हे | भुसावळ शहर हादरले! पूर्व वैमनस्यातून गोळ्या झाडून तरुणाची हत्या..

भुसावळ शहर हादरले! पूर्व वैमनस्यातून गोळ्या झाडून तरुणाची हत्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२५ । भुसावळ शहर, जे गुन्हेगारीमुळे सतत चर्चेत असते, तेथे आज (१० जानेवारी) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागातील हॉटेलमध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घडलीय. तहरीन नजीर शेख (वय ३०) असे मृताचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडालीय.

याबाबत असे की, शहरातील जाम मोहल्ला भागातील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहा या दुकानात हरीन नजीर शेख चहा पिण्यासाठी आला होता. यावेळी तीन ते चार संशयित आरोपींनी आपल्याकडील गावठी पिस्टलातून हरीन शेखवर पाच गोळ्या झाडल्या. या घटनेने दुकानातील ग्राहकांमध्ये पळापळ झाली तर काही क्षणात संशयीत दुचाकीवरून पसार झाले.

शरीरातील विविध भागात गोळ्या लागल्याने तेहरीनचा जागीच मृत्यू झाला तर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी धाव घेतली. चार संशयीतांचा कसून शोध सुरू आहे.

दरम्यान भुसावळ शहरात यापूर्वी आफात पटेल नावाच्या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणातील हरीन शेख हा प्रमुख संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. त्यातून ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेज शोधणे तसेच संशयित आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान पुन्हा खून झाल्यामुळे भुसावळ शहरात एकच खळबळ उडाली आहे. खुनाच्या घटनेमुळे भुसावळ शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.