एरंडोल येथे युवकाने घेतला गळफास

जुलै 15, 2021 12:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । एरंडोल येथे जहांगिरपुरा भागातील एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात कमरेच्या बेल्टच्या साह्याने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना काल १४ जुलै रोजी उघडकीस आली. दिपक हिम्मत अहिरे (२८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

dipak ahire succied

या घटनेच्या दिवशी दिपकची आई लग्नासाठी बाहेर गावी गेली होती आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

मनोज लोटन महाजन यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्रीराम पाटील,पंकज पाटील,संदीप सातपुते व अकिल मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now