सराईत गुन्हेगाराने केले युवकावर वार; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । दुचाकीवर जाणाऱ्या तरुणाला सराईत गुन्हेगाराने अडवून, त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून एक हजार रुपये लुटल्याची घटना, २५ रोजी दुपारी घडली. जखमी तरुणाने दिलेल्या जबाबावरुन गुन्हा दाखल झाला.

अमळनेर येथील मितेश जितेंद्र कामदार हा तरुण २५ रोजी दुचाकीने आपल्या दुकानावर जात होता. त्यावेळी संशयित दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभ याने मितेशला अडवून त्याच्या खिशातील एक हजार रुपये जबरीने काढून घेतले.