इलेक्ट्रीकचा शॉक लागून तरुण पेंटरचा मृत्यू

सप्टेंबर 2, 2021 12:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । रंगकाम करीत असताना एका ४० वर्षीय तरूणाचा इलेक्ट्रीकचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना जळगाव शहरातील जळगाव शहरातील पांडे चौकात घडली असून बाबुलाल बनीमियॉ पटेल (वय-४०) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, शहरातील तांबापूरा भागातील बाबुला पटेल हे पेंटरचे काम आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, बुधवारी पांडे चौकातील सुरेंद्र नथमल लुंकड यांच्या पत्र्याच्या शेडला रंगकाम करण्याचे काम करीत असताना त्यांना इलेक्ट्रीक वायरला धक्का लागला. त्यात त्यांचा शॉक लागून मृत्यू झाला.

दरम्यान मयत झालेल्या तरूणाची घरीची आर्थीक परिस्थिती हालाखीची असल्याने कुटुंबियाला आर्थीक मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयताच्या पश्चात आई अबीदाबी, पत्नी फरीदा, फरान, सना, शहिन हे तीने मुले आणि लतीफ, हारून आधि शरीफ हे तीन भाऊ असा परिवार आहे. मयत बाबुलालच्या नातेवाईकांना काम करून घेणाऱ्या व्यक्तीकडून आर्थीक मदत मिळावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा हिंदू-मुस्लिम एकता बिल्डींग पेंटर वेलफेअर असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष इस्माईल खान, जिल्हा सल्लागार अकील शेख अहमद, दगडू शहा पेंटर आदींनी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now